Loading...

अबब...मोहोळ तालुक्यात 13 हजार एकरहून अधिक क्षेत्रावरील ऊस हुमणी अळीने पोखरला

मोहोळ तालुक्यातील 3 साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील 13 हजार एकरपेक्षा अधिक क्षेत्रावरील ऊसावर हुमणी अळीचा प्रादुर्भा

Divya Marathi Sep 06, 2018, 22:46 IST

पापरी (सोलापूर) - मोहोळ तालुक्यातील 3 साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील 13 हजार एकरपेक्षा अधिक क्षेत्रावरील ऊसावर हुमणी अळीचा प्रादुर्भाव झाल्‍याचा अंदाज आहे. ऊस नोंदणी तसेच तालुका कृषी विभागाने केलेंल्‍या पाहणीतून हा अंदोज वर्तवण्‍यात आला आहे.

 

साखर कारखाने, महसुल व कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी एकत्रित पाहणी करून पंचनामे केल्यास बाधीत क्षेत्रात मोठी वाढ होण्‍याची शक्‍यता आहे. एकत्रित पाहणी केल्‍यानंतरच वस्तुस्थिती निदर्शनास येईल, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी श्रीधर जोशी यांनी दिव्य मराठीला दिली. हुमणीच्या प्रादुर्भावामुळे ऊस उत्पादकांची झोप उडाली असुन ऊस पिकावर केलेले सर्व भविष्यकालीन अर्थकारण व नियोजन कोलमडले आहे.


या संदर्भात अधिक माहिती देताना जोशी म्हणाले, मोहोळ तालुक्यात कुरुल, पेनूर, मोहोळ व नरखेड ही चार मंडले आहेत. गेल्या 3 दिवसांपासून कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक व मी स्वतः चारही मंडलातील ऊसाच्या क्षेत्राला भेट दिली. यादम्‍यान हुमणीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाल्याचे दिसले. प्रत्येक ऊसाच्या बेटाखाली पुंजक्याने हुमणी अळया आहेत. मोहोळ तालुक्यात ऊस गळीतासाठीचे क्षेत्र सुमारे 62 हजार एकर आहे. हुमणी निर्मुलनाबाबत शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन त्यांना विद्यापीठाच्या उपाययोजना सांगीतल्या जात आहेत. प्रत्येक गावातील कृषी वार्ता फलकावर कृषी सहाय्यकाना उपाय योजना लिहीण्याच्या सुचनाही दिल्या आहेत. सदरचा प्राथमिक अहवाल शासनाला सादर केला असुन वरिष्ठांचा आदेश आल्यावर त्यानुसार पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे. तालुक्यातील सर्व रासायनिक खते बि-बियाणे विक्रेत्यांना आपल्या दुकानात दर्शनी भागावर हुमणी अळीच्या उपाययोजनेबाबतची माहिती लिहीण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.

 

 


Loading...

Recommended


Loading...